बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे प्रेम अनेकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवते. मात्र अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच तसं प्रेम अनुभवायला मिळालं नाही.

News18 Showsha ला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, “माझं पहिलं प्रेम एका आयआयटीवाल्या मुलाशी झालं, ज्याच्याशी मी नंतर लग्न केलं. तेव्हा माझ्या कॉलेजमधले इतर मुली माझ्यावर जळायच्या. त्यांच्या पालकांनी त्यांना स्पॅघेटी टॉप घालण्यास परवानगी दिली नव्हती. त्यांच्यामते मी खूप मॉडर्न होते. त्या सगळ्या सलवार-कमीज-चुन्नी घालणाऱ्या होत्या.”
ती आणि तिचा तेव्हाचा प्रियकर सिनेमाला जायचा प्लॅन करत होते, पण तिच्या मैत्रिणींनी तिच्या आईवडिलांना सांगितले आणि ती कधीच गेली नाही. त्या काळात मोबाइल नव्हते, त्यामुळे ती त्याला कळवूही शकली नाही.
नीना पुढे म्हणाल्या, “मी कधीच प्रेमात नव्हते. चित्रपटांत आणि पुस्तकांत जे प्रेम दाखवलं जातं, ते मला कधीच अनुभवायला मिळालं नाही. कुणी माझ्यावर तसं प्रेम केलंच नाही. मी तरी कसं करू? कुणीतरी करायला हवं ना! माझ्या मागे कधी कुणी वेडं झालं नाही. पण मी मात्र एकावर वेड्यासारखं प्रेम केल होत. पण ते प्रेम संबंधात रूपांतरित होऊ शकलं नाही.”
नीना सध्या दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी विवाहबद्ध असून त्यांच्या लग्नाला जवळपास १३ वर्षे झाली आहेत. त्याआधी त्यांनी वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याशी संबंध ठेवले होते, आणि त्यांच्या दोघांची मुलगी मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
नीना सध्या अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो… इन दिनो’ या चित्रपटात अनुपम खेर यांच्या सोबत रोमँस करताना दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
