‘शेवटी बातमी बाहेर आलीच!’ राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लवकरच हलणार पाळणा..!

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) यांनी एक गूढ पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पत्रलेखाच्या प्रेग्नेंसीबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली होती. मात्र, राजकुमार राव यांनी लगेचच त्या बातमीचं खंडन केलं होतं. त्यांनी पोस्टखाली लिहिलं होतं – “P.S.: आम्ही अजून आई-बाबा बनत नाही आहोत.” त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये त्यांची प्रेग्नेंसीची बातमी फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं.

rajkumar patralekha

मात्र, काही महिन्यांनी म्हणजे जुलैमध्ये, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी अधिकृतपणे जाहीर केलं की ते लवकरच पालक होणार आहेत! चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी देताना, या दोघांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एका पाळण्याचा फोटो होता, ज्यावर “Baby on the way” असं लिहिलं होतं. त्यासोबत राजकुमारने एक साधं पण भावनिक कॅप्शन लिहिलं: “Elated ❤️❤️.” (मनापासून आनंदी)

या गोड बातमीनंतर फिल्म इंडस्ट्रीमधील त्यांच्या मित्रांनी कमेंट्समधून शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेता वरुण धवनने लिहिलं, “Congratualtionsssssss❤️❤️❤️❤️❤️,” तर सोनम कपूरने लिहिलं, “So happy for you both my dear friends ❤️.” पुलकित सम्राट म्हणाला, “Wowwwww!! Congratulations doston!! ❤️❤️❤️❤️,” आणि नेहा धूपिया म्हणाली, “Congratulations ❤️ you guys ❤️.”

पण सर्वात मजेशीर प्रतिक्रिया होती फराह खानची – “Finally the news is out!! I was having a tough time keeping it to myself 😂.. congratulations 🎈🍾🎉.” फराहने हे गुपित चांगलंच लपवून ठेवलं, आणि आता तीही आनंद व्यक्त करत आहे!

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणी 2010 साली सुरू झाली. तब्बल 11 वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी 2021 मध्ये थाटामाटात लग्न केलं. आता हे जोडपं त्यांच्या आयुष्यातील या नव्या, सुंदर टप्प्यावर प्रवेश करत आहे, त्यांना भरभरून शुभेच्छा!

Leave a Comment