करीना कपूरने प्राडावर केला अप्रत्यक्ष आरोप; नेमकं प्रकरणं काय?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने लक्झरी फॅशन ब्रँड Prada वर टीका करत पारंपरिक कोल्हापुरी चपलांच्या डिझाइनची नक्कल केल्याचा आरोप केला आहे. रविवारी तिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत अप्रत्यक्षपणे प्राडावर निशाणा साधला.

kareena kapoor

करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वतःचे एक फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती पारंपरिक कोल्हापुरी चपला घातलेली दिसते. चेहरा न दाखवता फक्त पाय आणि चपलांवर लक्ष केंद्रीत करत तिने लिहिले, “Sorry not Prada…but my OG Kolhapuri” (माफ करा, ही प्राडाची नाही, माझी ओरीजनल कोल्हापुरी आहे).

kareena kapoor02

प्राडाच्या या नव्या सॅंडल्सचे डिझाइन पाहून अनेक भारतीय सोशल मीडियावर संतापले. या पार्श्वभूमीवर बॉम्बे उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या कारागिरांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, Prada ने पारंपरिक डिझाइनचा वापर करून त्याचा व्यावसायिक फायदा घेतला आणि मूळ डिझाइन तयार करणाऱ्या भारतीय कारागिरांना कोणताही सन्मान किंवा लाभ दिला नाही.

kareena kapoor03

विवाद वाढल्यानंतर, Prada Group च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत भारतीय हस्तकलेच्या प्रभावाची कबुली दिली. त्यांनी म्हटले, “आम्हाला मान्य आहे की, प्राडा फॅशन शोमध्ये दाखवण्यात आलेल्या सॅंडल्स पारंपरिक भारतीय हस्तनिर्मित चपलांनी प्रेरित आहेत. आम्ही अशा भारतीय हस्तकलेच्या सांस्कृतिक महत्त्वाची पूर्णपणे जाणीव ठेवतो.”

हे सॅंडल्स जवळपास एक लाख रुपये किमतीचे असून, इतक्या पारंपरिक डिझाइनवर इतकी किंमत ठेवणे आणि मूळ भारताशी संबंध न दर्शवणे हे अनेकांना खटकले. यामुळे सांस्कृतिक अपप्रत्यय (Cultural Appropriation) आणि योग्य श्रेय या मुद्द्यांवर देशभर चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment